अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत(१० जिल्हे : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापुर, नगर, नाशिक, जलगाव, धुले व नंदुरबार तसेच पुणे व कोल्हापुर महानगर) चे अधिवेशन शिरुर येथे सुरु झाले.
या अधिवेशनास या सर्व जिल्हातील व महानगरातील निवडक १५०० कार्यकर्ते स्वताच्या खर्चाने आले आहेत।
उदघाटन मा न्यायमुर्ती श्री ए पी भंगाले, अध्यक्ष राज्य आयोग, ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले.
सदर अधिवेशनात श्री अरुण देशपांडे, अध्यक्ष मंत्रीस्तरिय ग्राहक कल्याण सल्लागार समीती व मध्य महाराष्ट्र प्रांत चे अध्यक्ष, संघटक तसेच सर्व कार्यकारीणी सदस्य तसेच श्री राजेंद्र पोल शिरुरचे तहसीलदार व शिरुरच्या नगराध्यक्षा श्रीमती वाखारे उपस्थीत होते.
उदघाटन समयी ग्राहक नव्हे राजा य स्मरणीकेचे प्रकाशन झाले.
न्यायमूर्ति साहेबांनी व श्री अरुण देशपांडे यांनी या समई सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले ।