ग्राहक कायद्याचे ज्ञान शालेय जीवनापासुन  विद्यार्थ्यांना होने गरजेचे आहे यासाठी ग्राहक जागरण कार्यक्रमाचा उपक्रम प्रत्येक शाळा ,महाविद्यालयातून राबवावा असे  प्रतिपादन तहसीलदार महेश सावंत यांनी केले

ग्राहक कायद्याचे ज्ञान शालेय जीवनापासुन  विद्यार्थ्यांना होने गरजेचे आहे यासाठी ग्राहक जागरण कार्यक्रमाचा उपक्रम प्रत्येक शाळा ,महाविद्यालयातून राबवावा असे  प्रतिपादन तहसीलदार महेश सावंत यांनी केले
शुक्रवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्य ग्राहक जागरण पंधरवाड़ाची विद्यार्थी  ग्राहक रॅलीला  मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते
आज सकाळी 9 वाजता खंडोबा चौकातुन जागो ग्राहक जागो च्या घोषनेने रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी   केंद्र प्रमुख वसंत ताकटे ,सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीक ,रमेश खांडेकर, बंडेराव जोशी,ग्राहक पंचायत चे तालुका अध्यक्ष राम आहूजा,संघटक विष्णु ढवले, अॅड. संदिप शिंदे, विष्णू सोनार,  अभिषेक वेदी,संजय चौके, राजेंद्र बडसल, नवनाथ वडेकर, एकनाथ चांदने, कृष्णा जाधव ,भीमसिंग बुंदिले उपस्थित होते
नाथ हायस्कूल,ग्रीन वुड इंग्लिश स्कूल, जैन इंग्लिश स्कूल, फीनिक्स इंग्लिश स्कूल, शालिवाहन विद्यालय ,जिल्हा परिषद नारळा च्या विद्यार्थ्यांनी ढोल पथक सह ग्राहक घोषणा दिल्या
शिवाजी महाराज चौकात  रॅलीच्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राहक संरक्षण परिषद सदस्य नानक वेदी यांनी करून 15 दिवस सर्व शासकीय विभागाचे कार्यक्रम तसेच निबंध ,वक्तृत्व स्पर्धा आयोजनाची माहिती दिली
या प्रसंगी  पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड,नगराध्यक्ष सूरज लोळगे, विजय चाटुपळे यांनी ग्राहक अधिकार  आणि  सेवा अधिकार  याची माहिती देऊन  विद्यार्थी यांनी खरेदी करतांना काळजी घेण्याचे आवाहन केले   या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक अशोक गिरी, ग्राहक  सदस्य रावसाहेब नाड़े, संतोष गोबरे, शिक्षक
ज्ञानेश्वर डुकरे  आबासाहेब कणसे, गहिणीनाथ वीर, एल डी म्हस्के, सुनिल बोरसे, सुनिल बोरसे, सुनिल अहिर, संदिप ढोले, शिवदास निकम, पांडुरंग खिल्लारे, अनिरुद्ध शिंदे, बाळासाहेब गांगड, अमोल वाघमारे, रईस सय्यद, रियाज गाजी, पी एन पाटील, देवढे , कांबळे , काळे , रावस ,श्रीमती
साळुंके , बेतवार , गव्हाणे  पाटील , म्हस्के , उषा कुलकर्णी , यु व्ही पाटील  प्रतिभा चव्हाण , शिंदे आदि उपस्थित होते