Are you purchasing without GST ???

बनावट GST बिल तपसा आपली फसवणूक रोखा. कोर्टात तक्रार करणेसाठी बिल लागते. बिना बिल माल खरेदि करू नका.

देशात GST लागू झाल्यापासून बरेच व्यापारी GST रजीस्ट्रेशन नसताना GST वसुल करत आहेत व काही हॉटेल मालक, दुकानदार मंडळी ग्राहकांची फसवणूक करताना दिसून येत आहे.

हॉटेल/दुकाना मध्ये बनावट GST बिल देऊन लोकांची फसवणूक करतायत

दुकानदार बनावट GST नंबर टाकून बनावट बिल देतायत आणि आपली फसवणूक होते.

GST रजिस्ट्रेशन केले आहे तोच दुुकानदार जीएसटी वसूल करु शकतो.

ग्राहकांनो,
१) बनावट सीएसटी बिल आणि जीएसटी क्रमांक कसा शोधून काढायचा.
२)चुकीचे काम करणाऱ्याला कसे पकडायचे.

तुमच्या स्मार्ट मोबाईलने हे काम करा व स्मार्ट व्हा.

त्या दुकानदाराला तुमच्याकडून GST वसूल करण्याचा अधिकार आहे किंवा नाही हे तपासा. बिल दिले जाते तेंव्हा ते तपासून पहा. प्रत्येक बिल वर दुकानदाराला आपला GST नंबर प्रिंट करणे बंधनकारक आहे. जर बिल वर GST नंबर नसेल तर अजीबात GST ची रक्कम देवू नका व सरकारकडे तक्रार पण करा.

तक्रार टोल फ्री क्र.1800 103 9271
Email: helpdesk@gst.gov.in

जर बिल वर GST नंबर असेल तर केंद्र सरकार च्या https://services.gst.gov.in/services/searchtp या वेबसाइट ला भेट देऊन तिथे तो GST नंबर टाका. त्या दुकानदाराची संपूर्ण माहिती आपल्या समोर येते.

तर मग ग्राहक राजा जागा हो.
बिना बिल माल खरेदि करून फसू नकोस.
सोन्या एैवजी पीतळ विकले तर?
भेसळयुक्त पदार्थ विकले तर?
शिळे अन्न खाऊन त्रास झाला तर ?
बिल नसेल तर कोर्टात जाता येत नाहि.

विजय सागर
अध्यक्ष,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे महानगर
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
www.abgpindia.com